उतू जाणाऱ्या सुखातही दुःखाचे चटके देणारा विकास हवा की, अभावातही आंतरिक सुख देणारे समाधान हवे, हे ठरवण्याची निर्णायक वेळ आज आली आहे!

प्रगती आणि विकासाच्या वेगाचा अतिरेकी ध्यास घेणारा अमेरिकन नागरिक आज युरोपियन देशांच्या तुलनेत आपली झोप कमी करून एका वर्षात तेरा महिने काम करतो. तरीही तो स्वतःला कायम असुरक्षित समजत असतो. ही विकासाची सूज की, प्रगतीचा बुडबुडा? दुसरीकडे विकासविषयक अनेक उणिवा आणि अभाव असतानाही चिमुकला भूतान आत्मिक समाधानाचा ध्यास धरतो आहे. उतू जाणाऱ्या सुखातही दुःखाचे चटके देणारा विकास हवा की, अभावातही आंतरिक सुख देणारे समाधान हवे,.......